‘जॉर्ज ऑर्वेल : करून जावे असे काही’ - स्पष्ट, स्वच्छ आणि प्रवाही शैलीतले हे ऑर्वेलचे चरित्र थक्क करून सोडते
काटकसरीनं जगणारा, स्वावलंबी, श्रमशक्तीवर विश्वास असणारा ऑर्वेल जसा दिसतो, तसाच लहानपणापासून लेखक होण्याची, लोकप्रिय लेखक होण्याची कांक्षा असणारा, पण स्वतःच्या लेखनावर अजिबात समाधानी नसणारा, स्वतःचाच कठोर समीक्षक ऑर्वेल ठळकपणे उमटला आहे. लेखिकेनं वर्तमानाशी ऑर्वेलच्या विचारांची जी सांगड घालून दाखवली आहे, ती महत्त्वाची वाटते, प्रस्तुत वाटते.......